नागपुर येथील राष्ट्रीय पुस्तक महोत्सवातील आमच्या क्रिएटिव्ह पब्लिकेशन्ज, नांदेड ( स्टॉल क्रमांक १३८/९) ला अनेक मान्यवरांनी भेट दिली… त्यामध्ये प्रामुख्याने वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाचे कुलसचिव प्रो.आनंद पाटील, इतिहास विभागाचे डॉ.बालाजी चिरडे, डॉ. तंगलवाड, कलकत्ता येथील नॅशनल लायब्ररीचे कर्मचारी मान. प्रफुल्लजी महाजन आणि किरण नरवाडे, ज्येष्ठ गांधी अभ्यासक, लेखक श्री जयंत कोकंडाकर, वरोरा येथील लोकमान्य महाविद्यालयाच्या प्राचार्या, प्रा. श्रीनिवास पिलगुलवार, प्रा.तानाजी माने, प्रा. लोणकर, ग्रंथपाल मॅडम, प्रा. राजेश चालीकवार, पीपल्स कॉलेजचे माजी प्राचार्य राम शेवाळकर सरांचे सुपुत्र आशुतोष शेवाळकर आदी मान्यवरांचा समावेश होता.वाचकांचा प्रतिसादही उत्साहवर्धक होता, वाचन कमी होत असल्याची तक्रार करत बसण्यापेक्षा असे ग्रंथ महोत्सव आयोजित करणे महत्त्वाचे आहे…. 🙏🙏
सेंट्रल पार्क येथे पुणे बुक फेयर (दि: ३० ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर) मधील क्रिएटिव्हच्या स्टॉलला अनेक मान्यवरांनी भेट दिली त्यात प्रामुख्याने जेष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस, जेष्ठ लेखक सदानंद मोरे, शिरीष चिटणीस, प्रा. माधवी कवि आदींचा समावेश आहे.
नॅशनल बुक ट्रस्ट द्वारा आयोजित पुणे बुक फेस्टिवल मध्ये क्रिएटिव्ह पब्लिकेशन्ज,नांदेडच्या स्टॉल क्र.एच-३० ला अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या त्यात मुख्य संयोजक राजेशजी पांडे, जेष्ठ लेखक डॉ. शरणकुमार लिंबाळे, जेष्ठ साहित्यक अनुवादक रवींद्र गुर्जर आदींनी भेटी दिल्या.